in

मोफत ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर पुन्हा चर्चेत

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील वेगवेगळ्या भागांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच आता मुंबईतील ऑक्सिजन मॅनची चर्चाही पुन्हा नव्याने होऊ लगाली आहे. मागील वर्षापासून मुंबईमध्ये कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या ३१ वर्षीय शहानवाज शेखचं काम अनेकांना प्रेरणा देणारं ठरत असून सोशल नेटवर्किंगवर तो पुन्हा चर्चेत आला. अनेकांनी त्याला त्याच्या या कामासाठी कडकडीत सॅल्यूट ठोकला आहे.

मलाडमधील ३१ वर्षीय शहानवाज शेखने मागील वर्षी जून महिन्यात म्हणजेच कोरोनाबद्दल सर्वत्र भीतीचं वातावरण असताना, स्वत:ची फोर्ड एण्डीव्हर ही महागडी एसयुव्ही गाडी विकून त्यामधून कोरोनाबाधितांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली. हे काम हाती घेतल्यानंतर पहिल्या तीन आठवड्यांमध्ये शहानवाजने २५० हून अधिक कुटुंबांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवून मदत केली. त्यानंतर त्याने स्वत:ला या कामामध्ये झोकून दिलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘विरार दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; आरोग्यमंत्र्यांचं विधान

राज्यातील साखर कारखाने करणार ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा!