in

नंदुरबारमधील धडगाव येथील covid-19 स्वॅब संकलन केंद्र कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे बंद

सातपुडा दुर्गम भागातील धडगाव येथील Covid-19 स्वॅब संकलन केंद्र कालपासून कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कार्यरत नाही. या ठिकाणी स्वॅब संकलन करणाऱ्या डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने रुग्णांचे स्वॅब संकलन करण्यासाठी कर्मचारी नसल्याचे उत्तर कार्यालयातर्फे देण्यात आले आहे. धडगाव तालुक्यात रॅपिड एंटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांद्वारे RT-PCR लॅब मधून चाचणी करण्यासाठी या केंद्रावर गर्दी केली जात आहे.

धडगाव येथील स्वॅब संकलन केंद्र बंद असल्यामुळे रॅपिड एंटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या गर्दीमुळे पुन्हा कोरोणाची बाधा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कालपासून या केंद्रावर डॉक्टर उपलब्ध नाही तरीदेखील कर्मचाऱ्यांनी खेड्यापाड्यावरून आलेल्या नागरिकांना दुपारपर्यंत ताटकळत बसवून ठेवलं. त्यानंतर सांगितलं की डॉक्टर येणार नाहीत. आरोग्य विभागाच्या या कार्यप्रणालीवर स्वॅब संकलनासाठी आलेल्या रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंढरीच्या विठुरायासमोर द्राक्षांची आरास!

Pandharpur By Poll | निडणुका भोवल्या… पंढरपुरात ३ हजार २२८ कोरोनाबाधितांची नोंद