पुढच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी भाषणादरम्यान म्हटले होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये हारल्यानंतर त्या नव्याने मतदारसंघ शोधत असाव्या, असा टोला मोदींनी लगावला आहे.
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवलेल्या वाराणसी मतदारसंघात त्यांना आव्हान देण्यासाठी ममता दीदी उभ्या राहतील, असे तृणमूल काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयावर विश्वास व्यक्त केला आहे.
Comments
Loading…