in

Farmer MSP | खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्राचा MSP संदर्भात मोठा निर्णय

देशभरात मान्सूनचे आगमन होत असतानाचा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. भातावरील एमएसपीमध्ये ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर १ हजार ८६८ रुपये प्रतिक्विंटल तांदुळ आता १ हजार ९४० प्रतिक्विंटल झाला आहे.

यासह बाजरीवरील देखील एमएसपी वाढवण्यात आल्याची माहिती केंद्राने दिलीय. बाजरी प्रतिक्विंटल २ हजार १५० रुपयांवरून २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. तर त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला ३०० रुपये प्रतिक्विंटल तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ तीळाला देण्यात आली. तिळाचे भाव ४५२ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता लहानमुलांसाठी येणार ‘कोरोना लॉलीपॉप टेस्टींग किट’

Zomatoची सर्व फूड डिलीव्हरी वाहनं होणार इलेक्ट्रिक