in ,

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन विशेष | …आणि शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले!

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या पहिल्या फळीत राजकीय डावपेचांना सुरुवात झाली. पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे पक्षाची कमान देण्यात आली. यानंतर १९९८मध्ये सिताराम केसरी यांच्याकडे काँग्रेसची जबाबदारी आली. मात्र काही महिन्यांनी त्यांच्या विरोधातील पक्षांतर्गत बंडाळीला सुरुवात झाली. यानंतर सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्याचा काही काँग्रेसजनांनी प्रयत्न केला. याचसोबत देशातील काँग्रेची धुराही त्यांनीच सांभाळावी, अशी मागणी झाली. मात्र सोनिया गांधींच्या इटालियन आयडेंटिटी वरून शरद पवारांनी याच मुद्द्याचं राजकारण केलं आणि संधी साधली.

१९९९च्या मे महिन्यात शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले. पक्षातील तारीक अन्वर, पी.ए.संगमा यांना सोबत घेऊन पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. पक्षाची व्याप्ती फक्त महाराष्ट्रापुरती न राहता देशभरातील निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा हेतू पवारांच्या मनात होता. आजही राष्ट्रावादीचे उमेदवार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, इ यांसारख्या राज्यातून निवडणूक लढवते. यावर्षी पार पडलेल्या केरळ निवडणुकांमध्येही राष्ट्रवादीने उमेदवार दिले होते.

१९९९ साली महाराष्ट्रात निवडणुका लागल्या. यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं. यानंतर पुन्हा काँग्रेससोबत संसार थाटला. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत सरकार आलं. २००४ साली केंद्रात मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारलाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. ज्या सोनिया गांधींच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार बाहेर पडले होते. त्याच सोनिया गांधीशी त्यांनी जवळीक साधत पुन्हा काँग्रेससोबत उभे राहिले.
२०१२ साली पी.ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.

२०१४ च्या निवडणुकांपर्यंत हे सरकार कायम होतं. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो पक्ष स्थापनेपासून सत्तेत सलग १५ वर्षे होता. २०१४ ला देशात मोदी लाट आल्यानंतर राज्यातही त्याचा परिणाम जाणवला. मात्र लाटेतही राष्ट्रवादीचे पाच खासदार निवडून आले. परंतू, राज्यात सर्व पक्षांचं समीकरण बदललं. यावेळी राष्ट्रवादीनेही स्वत:च्या बळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सरकार भाजपाकडे गेलं. पण शिवसेनेने सत्तास्थापनेस होकार देण्याआधीच राज्यात सरकार स्थापन होण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर राज्यात युती सरकार आले. पाच वर्षांच्या शिवसेनेसोबतच्या संसारानंतरही अंतर्गत कलह न मिटल्याने अखेर २०१९च्या निवडणुकांनंतर दोन्ही युतीत फूट पडली. त्याचं रुपांतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्यात झालं.

अखेर शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत वाटाघाटी करत महाविकास आघाडीचं नवं समीकरण राज्यात मांडलं. याआधी राज्यात पुरोगामी लोकशाही आघाडीचं शिवधनुष्यही शरद पवार यांनीच पेललं होतं. आता महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यामागेही राष्ट्रवादीचा ‘रोल’ मोठा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Watch Video:शेतीवरून वाद;दोन गटात तुंबळ हाणामारी

सांगा आता कस जगायचं ?