in ,

”नवाब मलिक गांजा पिऊन बोलतात”; अतुल भातखळकर यांची सडकून टीका

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने औषध विक्रेत्या कंपन्याना महाराष्ट्राला रेमडेसिवीर न विकण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपावर आता भाजपने समाचार घेतला आहे.

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन हा आरोप केला आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपले म्हणणे सिध्द करावे, नाही र माफी मागून तोंड काळे करा असे आव्हान देखील भातखळकर यांनी नवाब मलिक यांना दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Bypoll Election : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत 33.12 टक्के मतदान

मेळघाटात अंधश्रद्धेचा बळी… कोरोनाबाधित महिलेला उपचारांसाठी नेलं मांत्रिकाकडे!