in

नवाब मलिकांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार – अनिल बोंडे

सुरज दहाट, अमरावती | अमरावती झालेली दंगल भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीच घडवली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब यांनी केला होता. या आरोपावर आता नवाब मलीकांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असणार असल्याचे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.

अमरावतीमध्ये भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड व जाळपोळ झाली.तर अमरावतीमध्ये जी जाळपोळ,दंगल झाली यासाठी भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीच दंगल घडवली व त्यासाठी मुंबईतून पैसा आला. तसेच अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांना दारू पाजून दंगल घडवली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब यांनी अनिल बोंडे यांच्यावर केला होता.

या आरोपावर अनिल बोंडे यांनी आक्रमक पावित्रा घेत नवाब मलिक बेताल व्यक्ती आहे. त्यांनी माझ्यावर जे आरोप लावले त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे नाही तर मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे त्यांना अमरावती येथील कोर्टात मी खेचनार आहे. आणि अमरावती येथील दुखावलेले नागरिक त्यांचे तंगडे त्यांच्याच गळ्यात टाकणार आहे.

दरम्यान अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरावतीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. या दंगल प्रकरणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. तसेच अन्य 50 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हिंसाचार प्रकरणी 15 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चीनच्या प्रसिद्ध विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव; 1500 विद्यार्थी निरीक्षणाखाली

‘पृथ्वीराज’ सिनेमाचा टीझर रिलीज; लवकरच होणार प्रदर्शित