in

‘महाराष्ट्र लॉकडाऊन’ संदर्भात नवाब मलिक यांचं मोठं विधान

“राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाऊन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाऊन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कोरोना परस्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले होते की,“सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करू तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाऊन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसारनंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये” असे ही सांगण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार’

केंद्र सरकारला पत्र लिहून नुकसानग्रस्तांसाठी मदतीची मागणी