in

‘लोकांनी मालदीवला एक तमाशा बनवला आहे’ ; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने झापलं

संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यादरम्यान अनेक सेलिब्रिटी परदेशी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. या सेलिब्रिटींना बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चांगलच झापलं आहे.

लोकांना अन्न नाही आणि तुम्ही पैसे फेकून मज्जा करत आहात. थोडी तरी लाज राखा, अशा शब्दांत नवाजुद्दीन सिद्दीकीने परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना सुनावलं आहे. लोकांनी मालदीवला एक तमाशा बनवला आहे. मला नाही माहिती त्यांचे टूरिजम इंडस्ट्रीशी काय लागेबंध आहेत. पण माणुसकीच्या नात्याने तर कृपया आपल्या व्हॅकेशनचे फोटो आपल्याकडे ठेवा, असं नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला.

इथं प्रत्येकजण कठीण काळाला सामोऱ्य जातो आहे. कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, ज्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून आणि दु:खी करु नका, असंही नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटलंय. मालदीवला जाणार आहेस का? असा प्रश्न वाजुद्दीन सिद्दीकीला विचारण्यात आला. यावर बिलकुल नाही, मी माझ्या घरी बुधानामध्ये कुटुंबासमवेत आहे. हे माझे मालदीव आहे, असं त्याने म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Vaccination: राज्य सरकार मोफत लसीकरण करणार, नवाब मलिक यांची माहिती

Remdesivir शिवाय 5 हजार रुग्ण केले बरे, जाणून घ्या अहमदनगरच्या डॉक्टरची उपचार पध्दती