अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ही कारवाई केली आहे. एजाजच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. यात ड्रग्जचं काही साहित्य आढळून आलं आहे. याप्रकरणी ड्रग्ज पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर एजाज खानचं नाव समोर आलं होतं.
राजस्थानहून मुंबईत परतल्यानंतर एनसीबीनं काल ताब्यात घेतलं. एनसीबीची टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे.
Comments
Loading…