in

‘नाराजांची संख्या वाढू नये म्हणून भाजपकडून सरकार पाडण्याच्या वल्गना’

राज्यात एकीकडे करोनाचं संकट असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा नेत्यांकडून वारंवार महाविकास आघाडी सरकार पाडण्याची वक्तव्यं केली जात असून भाकीतंही वर्तवली जात आहे. येत्या काही महिन्यात सरकार पडणार असल्याचे दावे भाजपा नेत्यांकडून केले जात आहेत. दरम्यान भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणाऱ्या एकनाथ खडसे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. “आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई – किशोरी पेडणेकर

चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर 54 आमदारांचं पत्र चोरल्याचा आरोप केला!