in

राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांचे हृदयविकाराने निधन

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन झाले आहे.
पाचगणी येथील पुस्तकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या भिलार गावचे सुपुत्र बाळासाहेब भिलारे यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने 72 व्या वर्षी निधन झाले.

काही दिवसापासून बाळासाहेब भिलारे यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर ते निवासस्थानी विश्रांतीसाठी आले होते, मात्र आज सकाळी अकरा वाजता अचानक त्यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाला व यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाबळेश्वर-पाचगणी येथे राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”

SAWANTWADI