in

राष्ट्रवादीची गुंडागर्दी यापुढे सहन करणार नाही, सदाभाऊ खोत यांचा इशारा

संजय देसाई, सांगली | गोरगरिबांचे आणि बहुजनांचे प्रश्न घेऊन महाविकास आघाडी सरकार विरोधात आवाज उठवत असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्ला घडवून आणल्याचा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे हे गुंडागर्दी यापुढे कदापी सहन केले जाणार नाही,असा इशारा देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

याआधीही राष्ट्रवादीकडून आमदार पडळकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.त्यामुळे भविष्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीविताला धोका असून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे.तेव्हा त्यांना तात्काळ संरक्षण देण्यात यावे,अशी मागणीही आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘जय भीम’ सिनेमाला देशभरातून चांगला प्रतिसाद

गाडी भाड्याने लावण्याचं आमिष दाखवत करायचा परस्पर विक्री, पोलीस आरोपीच्या मागावर