in

‘ही तर कोरोना पसरवते…’, कंगनाचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

बॉलिवूडची क्वीन म्हणून अभिनेत्री कंगान रणौत ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्याचदरम्यान कंगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने कंगनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्लेटमधून पेस्ट्री घेते, तोंडा जवळ घेऊन जाते आणि परत त्या प्लेटमध्ये ठेवते. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन तिला अनेकांना ट्रोल केले आहे. पण हा व्हिडीओ कुठला आहे अद्याप समोर आलेले नाही.

एका यूजरने कमेंट करत ही तर करोना पसरवते असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘मस्तच, पहिले तिने हातात की पेस्ट्री घेतली, नंतर तिने श्वास घेतला आणि नंतर पुन्हा प्लेटमध्ये ठेवली. आता ती दुसरं कुणी तरी खाणार’ अशी कमेंट करत कंगनाला सुनावले आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘करोना काळात कंगनाचे असे वागणे चुकीचे आहे’ असे म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस

“आयोगाची खात्री पटली आहे की देशात कोरोना नष्ट झाला”, पाच राज्यांमधील निवडणुकांवरून संजय राऊतांचा खोचक निशाणा!