राज्यातील वाढता कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव पाहता सोमवारपासून दररोज रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यासह ब्रेक दि चेनचा आदेश काढण्यात आला, या आदेशात नवीन सुधारणा करून आणखी काही सेवांना अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. यानुसार दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू आहे. काल 4 एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आलेत.
‘या’ सेवांचा अत्यावश्यक सेवेत समावेश
- पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
- सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
- डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा
- शासकीय व खासगी सुरक्षा सेवा
- फळविक्रेते
- खासगी आस्थापना आणि कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी
Comments
Loading…