in ,

शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर; ‘या’ 16 जणांना मिळाली संधी

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खासदार सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाल्याचं दिसत आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. याशिवाय अ‍ॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यासारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

कोणा कोणाची लागली प्रवक्तेपदी वर्णी?

  • संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
  • अरविंद सावंत – खासदार – मुख्य प्रवक्ते
  • प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
  • अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
  • सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन निवड)
  • सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
  • प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
  • भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन निवड)
  • अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन निवड)
  • मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन निवड)
  • किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
  • शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन निवड)
  • डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन निवड)
  • किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन निवड)
  • संजना घाडी (नवीन निवड)
  • आनंद दुबे (मुंबई) (नवीन निवड)

What do you think?

-6 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लॉकडाउन करण्याआधी रोजगाराचे पैसे बँक खात्यात जमा करा’

गडबड घोटाला ! भाजपाच्या प्रचार व्हिडिओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप