in

‘संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र चोरल्याचा आरोप केला असून यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील उत्तर दिलं असून एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना संपादकीयमधून पत्र चोरताना खोलीत भाजपाचे कोण नेते होते? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. यावरुन भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी आता उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे. “संजय राऊतांनी कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसरं, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही,” अशी टीका नीलेश राणे यांनी ट्विटमधून केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

गोंदिया जिल्ह्यात 96 गावांना पुराचा धोका