in

मुंबईत ‘निर्भया’ची पुनरावृत्ती | खूप रक्तस्त्राव झाल्याने पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर – महापौर

मुंबईत ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली आहे. दिल्लीत २०१२ साली घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणाची आठवण देणारी क्रूर घटना आहे. याप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पीडितेची यांनी भेट घेऊन त्यावर खूप रक्तस्त्राव झाल्याने पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

आरोपीनं एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर एक व्यक्ती महिलेला मारहाण करीत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या सुमारास करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

At post umari taluka karanja Ghadge Dist wardha

जाणून घ्या, बाप्पाला मोदक का आवडतात?