in

“बाळासाहेब असते… तर पहिल्यांदा फडणवीसांना आमंत्रण दिलं असतं”

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीचा भूमिपूजन सोहळा मुंबईतील दादरच्या जुन्या महापौर बंगल्यात पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आले होते. मात्र विरोधी पक्ष भाजपा आणि मनसेला बगल देण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रण नव्हते. तसेच या भूमिपूजन सोहळ्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील नाव निमंत्रण पत्रिकेवर नव्हते. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता असते, तर त्यांनी पहिले निमंत्रण हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिले असते. बाळासाहेब हे राजा माणूस होते, आणि राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. मात्र आता केवळ बाळासाहेबांचे किस्से उरले आहेत. मने खूप लहान झाली आहेत. असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

तसेच या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना का बोलवण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करत, ही आश्चर्याची गोष्ट असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Good News | एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

रेवदंडा-रोहा रस्त्यावर भीषण अपघात, ३ जण ठार