in ,

“तुम्हीच मीटर रिडींग घ्या आणि वीज बिल भरा”

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला अतिशय महत्त्वाचे आवाहन केले आहे. वीज वापराचे मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’च्या निर्बंधांमुळे प्रत्यक्ष रिडींग घेणं शक्य होणार नाही. तसेच महावितरणनेही वीज ग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी यासाठीची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मागील लॉकडाऊन काळात अनेक ग्राहकांना त्रास झाला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये आणि ग्राहकांना त्रास होऊ नये, कारण ग्राहक हा आमचा राजा आहे, आमचं दैवत आहे, असे नितीन राऊत म्हणाले.

स्वत:च मीटर रिडींग घेऊन ग्राहकांनी ते संबंधित विभागांना पाठवावं, शिवाय ज्यांची घरं बंद असतील त्यांनी सर्व स्वीच बंद करुनच घराबाहेर पडावं. त्यावेळी बंद केल्यानंतरच्या रिडींगची उर्जा विभागाला माहिती द्यावी, जेणेकरुन पुढं सरासरी आकडेवारी काढण्याची आवश्यकता राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ही यंत्रणा कार्यरत असणार आहे, असं म्हणत नितीन राऊत यांनी जनतेने आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह यांची चौकशी संपली

राज्यात निर्बंध विचार न करता लावले; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला