in

‘7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास’ काँग्रेसकडून बॅनरबाजी करत भाजपवर हल्लाबोल

मोदी सरकारच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबई निदर्शनं केली आहे. ‘7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास’ अशी बॅनरबाजी सुद्धा काँग्रेसने केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निदर्शनं करण्यात आली आहे. परभणीमध्ये काळे झेंडे दाखवत मोदी सरकारचा निषेध

केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलो आहोत, गेल्या सात वर्षात मोदी सरकारने कोणतेही विकासाचे काम केले नाही. कोरोनाच्या काळात मोदी सरकारने केलेले ढिसाळ नियोजन केले आहे. अशी टीका यावेळी नाना पटोले यांनी केली.

तर, सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. 15 लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा संपवू, महगाई कमी करू अशी अनेक आश्वासने दिली होती. पण, आता पेट्रोल शंभर पार झाले, एलपीजी नऊशेवर गेला. खाद्यतेल 60 रुपये होते ते आता 200 वर गेले आहे, त्याच प्रमाणे मोदी सरकारने कामगार कायद्यामध्ये बदल केले, कामगारांपेक्षा मालकांना जास्त विचारात घेतले गेले. अशी बोचरी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दारुबंदीच्या मुद्द्यावरुन रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

५६ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉनसन अडकले लग्नबंधनात