in

मुंबईत लॉकडाउन नाही पण कडक निर्बंध – महापौर

राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाउन संबधीत महत्वाची घोषणा केली आहे. मुंबईत उद्यापासून लॉकडाउन नाही पण कडक निर्बंध लागणार आहेत अशी माहिती महापौरांनी दिली आहे. यावेळी हॉटेल, धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे . त्याच प्रमाणे कार्यालयात 50 टक्के उपस्थिती लावण्याचा विचार देखील प्रसानाने केला आहे. दुकानं एकदिवसाआड उघडण्याचे आदेश देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला तर 31 तारखेपर्यंत आकडेवारी होती आता 3 हजार 900 बेड उपलब्ध आहेत. तर 324 आयसीयू बेड उपलब्ध आहेत व्हेंटिलेटर बेड 170 उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे त्याप्रमाणे धोखा देखील वाढत आहे. इमारती मधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उपलब्ध बेड आहे त्यापेक्षा अधिक बेड उपलब्ध करण्यासाठी तयारी सुरू आहे. अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tamil Nadu Elections 2021 : माजी केंद्रीय मंत्र्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, प्रचार करण्यास 48 तासांची बंदी!

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना आतापर्यंत शंभर कोटीच्यावर देशी-विदेशी अवैध दारू पकडली