in

कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सदर आदेश दिले आहेत. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे.

आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. १५ दिवसांत अहवाल द्यायचा आहे. अनिल देशमुख ही चौकशी योग्य प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. यामध्ये मलाही बोलावण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही, असे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा; देवेंद्र फडणवीस

कोरोनाबाधित कैदी रुग्णालयातून फरार