संपर्ण देशात आता लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असे मोठे विधान पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना केले. याचबरोबर महाराष्ट्राचे नाव न घेता त्यांनी सरकारला टोला ही हाणला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मी टीका सहन करुन गप्प राहतो, एकाच राज्याला कोरोना लस देऊ शकत नाही, असे विधान करत मोदी यांनी नाव न घेत महाराष्ट्राला टोला लगावला.
राज्यसरकारने लोकांमध्ये लसीसंदर्भात जागरूकता निर्माण करावी. तसेच समाजातील मान्यवरांनी या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन मोदी यांनी केले. ११ एप्रिल महात्मा फुलेच्या जयंती पासून १४ एप्रिल पर्यंत लसीकरण उत्सव साजरा करूया अशी घोषणा देखील मोदी यांनी यावेळी केली.
तरुणांनी लसीकरणात पुढाकार घ्यावा
नागरिकांनी लस घेतल्यावर सावधान रहावे. तसेच लसीकरणात तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील मोदी यांनी केले. तसेच राज्य सरकारने नागरिकांमध्ये जनजागृती करावी
Comments
Loading…