मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मूठ आवळली आहे. बचेंगे तो और भी लढेंगे, माणसं जगली तर पुढचं काही करता येईल. त्यामुळे निर्बंध कडक केले जातील. लोकांनी नियम पाळले पाहिजे, अनेकजण मास्क वापरत नाहीत. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. मात्र नियम पाळले नाहीत तर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर राजकारण नको असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Comments
Loading…