in

लातूरात पुढील आदेशापर्यंत विकेंड लॉकडाऊन नाही

लातूर जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत विकेंड लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सर्व दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत. तसेच सर्व आठवडी बाजार सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्य पाच टप्प्यात अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने 6 जून रोजी अनलॉकचे आदेश दिले आहेत. तेच आदेश शनिवार आणि रविवार या दिवशी ही लागू राहणार आहेत. विकेंड मध्ये ही सर्व दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ही त्या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे. तरी लातूर जिल्ह्यात या पुढील काळात प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत वीकेंड लॉकडाऊन नसेल असे सांगण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला गोवर्धनचे सरपंच गजानन वानखेडे यांच्याशी संवाद

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा