in

ऑस्कर 2021 पुरस्कारांमध्ये ‘नोमडलँड’ची वर्णी

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘नोमडलँड’सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत 2021 सालातील ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

लॉस एन्जेलेसमध्ये हा सोहळा पार पडतोय. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने पर पडतोय. युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर इथं हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज सर्वोच्च न्यायालयात ठरणार गोकुळ निवडणुकीचा फैसला

कोरोनावर नियंत्रण, राजकारण करण्याची गरज नाही