in

‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही’, म्हणतं राज ठाकरेच्या थलावया रजनीकांत यांना शुभेच्छा

सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वांनीच रजनीकांत यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न…

Posted by Raj Thackeray on Thursday, 1 April 2021

राज ठाकरे यांनी फेसबुक अकाऊंटवर रजनीकांत यांचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन’ असे म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना आतापर्यंत शंभर कोटीच्यावर देशी-विदेशी अवैध दारू पकडली

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन लाँच