in

आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक

सध्या देशात कोविड-१९ ची दुसरी लाट आणि त्यानंतर ब्लॅक फंगस (Black Fungus) व नंतर व्हाइट फंगसने(White Fungus) लोक हैराण झाले आहेत. आता देशात यलो फंगसने (Yellow Fungus) डोकं वर काढलं आहे.

DNA वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञांनी या नव्या फंगसची लक्षणेही सांगितली आहेत. यलो फंगसच्या रूग्णाला सुस्ती, भूक कमी लागणे किंवा अजिबातच भूक न लागणे यासारखी सुरूवातीची लक्षणे दिसतात. सोबतच रूग्णाचं वजन कमी होऊ लागतं. तेच गंभीर स्थितीत जखमा कमी वेगाने ठीक होणे, कुपोषण, अवयव काम करणे बंद होणे अशाही स्थिती निर्माण होतात. याने ग्रस्त रूग्णाचे डोळे आतल्या बाजूला घुसतात.

इतर दोन्ही फंगसपेक्षा घातक

यलो फंगस इतर दोन ब्लॅक आणि व्हाइट फंगसपेक्षा जास्त घातक आहे. कारण हा आजार शरीराच्या आत सुरू होतो आणि फार नंतर याची लक्षणे बाहेर दिसू लागतात. अशात लक्षणे दिसताच लगेच त्यावर उपचार घेतले गेले पाहिजे.

यलो फंगसची कारणे

इतर दोन फंगसप्रमाणे यलो फंगसचं संक्रमण होण्याचं कारणही अस्वच्छता आणि ओलावा आहे. त्यामुळे घरात – आजूबाजूला स्वच्छता ठेवा. बॅक्टेरिया आणि फंगसला विकसित होण्यापासून रोखण्यासाठी जेवढ्या लवकर शक्य असेल जुने खाद्य पदार्थ टाकून द्या. त्यासोबत घरात ओलावा असल्यानेही बॅक्टेरिया आणि फंगस वाढतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

रामदेवबाबांचं पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले…