in

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे टाईप न करता पाठवता येणार मेसेज

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आता आता टाईप न करता मेसेज पाठवणं शक्य होणार आहे.यासाठी तुम्हाला अ‍ॅडवान्स व्हॉईस रिकग्निशनची मदत घ्यावी लागणार आहे. ही ट्रिक अँड्रॉइड फोनवर कार्य करते.

मात्र, यासाठी तुम्हाला काही सेटिंग्ज बदलाव्या लागणार आहेत. या सेटिंग बदलल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर टाईप न करताही मेसेज करू शकतात.जेव्हा तुमच्याकडे फोनचं अ‍ॅक्सेस नसेल तेव्हा हे फीचर तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. गुगल असिस्टंटने 2015 मध्ये व्हॉइससह व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवण्याची सुविधा सुरू केली. Apple siri ने 2016 मध्ये हे फिचर लाँच केले असून याच्या मदतीने थर्ड पार्टी अ‍ॅप्सवरून व्हॉइसद्वारे मेसेज पाठविले जाऊ शकतात.

असा पाठवा मेसेज :

▪️ सेटिंगमध्ये जाऊन गुगल असिस्टंटच्या उजव्या कोपऱ्यावरील तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
▪️ त्यानंतर पर्सनल रिझल्टवर खाली स्क्रोल करून या फंक्शनला ऑन करा.
▪️ व्हॉइस असिस्टंट अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, तुम्हाला Hi Google किंवा OK Google म्हणावे लागेल.
▪️ तुम्हाला Send a whatsapp Msg असे म्हणावे लागेल.
▪️ तदनंतर ज्याला मेसेज पाठवायचा त्याचं नाव घेऊन गुगल असिस्टंट तुम्हाला विचारेल, तुम्हाला कोणता मॅसेज पाठवायचा.
▪️ तुम्हाला जो काही मॅसेज पाठवायचा आहे, तो तुम्हाला Send It म्हणून तो पाठवता येणार आहे.
▪️ या फिचरमुळे टाईप न करता Google असिस्टेंटच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवू शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Hemant Nagrale | साकिनाका बलात्कार मृत्यूप्रकरणात अॅट्रॅासिटीचा गुन्हा दाखल