in

आता नवा ‘वसुली मंत्री’ कोण ? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात हायकोर्टानं आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?”, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, ट्विट करत त्यांनी अशी टीका केली आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते पी. बालचंद्रन यांचे निधन

अंबानी स्फोटक प्रकरण ते अनिल देशमुख यांचा राजीनामा…संपूर्ण घटनाक्रम