in

OBC Reservation ओबीसी आरक्षण : राज्यभरात भाजपाकडून तीव्र आंदोलनं

सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थगित केलं. यानंतर भाजपानं राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आता ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थगित असताना राज्यातील ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी भाजपाकडून आंदोलनं केले जात आहेत.

कोल्हापूर – OBC ला राजकीय आरक्षणा द्या या मागणीसाठी भाजपा आक्रमक. कोल्हापूरचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे – ओबीसींच्या हक्काच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन. आघाडी सरकारच्या निष्क्रियपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा भाजपचा आरोप आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला आहे.

नागपूर – भारतीय जनता पक्षाच्या वतीने जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नागपूर शहरात सहा ठिकाणी आंदोलन होत आहे.

नाशिक – ओबीसींच्या हक्काच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन. आघाडी सरकारच्या निष्क्रियपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा भाजपचा आरोप.

औरंगाबाद – भाजपा कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचं आंदोलन. मुख्य रस्त्यावर शेकडो कार्यकर्त्यांचा ठिय्या. भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण घालवल्याचा आरोप. भाजपच्या आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त. भाजप कार्यकर्ते आणि भाजप महिला कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्पुटनिक लाइटचा मार्ग मोकळा होणार?

यवतमाळच्या सुमितने साकारला नारळातून गणपती