in

ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभर आंदोलन करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ओबीसी आरक्षणारबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत, आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलच होते.

नागपूर शहरात उद्या सहा ठिकाणी भाजपचं धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सहा विधानसभा मतदार संघातही आंदोलने होतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते या आंदोलनता सहभागी होतील, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. हा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगत सरकारवर टीकास्त्र सोडलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीच्या वर्धा नदीत बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ; लाचलुचपत विभागात तक्रार दाखल