in

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यामध्ये २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १० इमारतींचा समावेश आहे,  अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी माध्यमांना दिली.
  
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत.  दरवर्षी  या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार मे महिन्या अखेरपर्यंत ०९ हजार ४८ उपकरप्राप्त इमारतींचे (६८ टक्के)  सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून २१ इमारती अतिधोकादायक असल्याचे  निदर्शनास  आले आहे.  या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू/रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षमकरण्यात आली आहे. अशी माहिती घोसाळकर यांनी दिली

 मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या २१ इमारतींची यादी पुढीलप्रमाणे    
१) इमारत क्रमांक १४४,एमजीरोड,अ- ११६३ (मागील वर्षीच्या यादीतील)     
२) इमारत क्रमांक १३३ बी बाबुलाल टॅंक रोड,  बेगमोहम्मद चाल ,  
३) इमारत क्रमांक ५४ उमरखाडी,१ ली गल्ली छत्री हाऊस , 
४) इमारत क्रमांक १०१-१११, बारा इमारत रोड,  (मागील वर्षीच्या यादीतील)  
५) इमारत क्रमांक ७४ निजाम स्ट्रीट,  (मागीलvवर्षीच्या यादीतील)  
६) इमारत क्रमांक १२३,किका स्ट्रीट  (मागीलवर्षीच्या यादीतील)  
७) इमारत क्रमांक १६६ डी मुंबादेवी रोड ,  (मागील वर्षीच्या यादीतील)   
८) इमारत क्रमांक २-४ ए ,२री भोईवाडा लेन ,  
९) इमारत क्रमांक ४२ मस्जिद स्ट्रीट   
१०) इमारत क्रमांक १४ भंडारी स्ट्रीट  (मागीलवर्षीच्या यादीतील)   
११) इमारत क्रमांक ६४ -६४ ए  भंडारीस्ट्रीट  , मुंबई   
१२) इमारत क्रमांक १-३-५ संत सेना महाराज मार्ग   
१३) इमारत क्रमांक ३ सोनापूर २ री क्रॉस लेन   
१४) इमारत क्रमांक २-४ सोराबजी संतुक लेन  ,    
१५) इमारत क्रमांक ३८७-३९१,बदाम वाडी व्ही पी रोड  (मागीलवर्षीच्या यादीतील)  
 १६) इमारत क्रमांक ३९१ डी बदाम वाडी,व्ही पी रोड  (मागीलवर्षीच्या यादीतील)   
१७) इमारत क्रमांक २७३ -२८१ फॉकलँड रोड ,  डी,  २२९९- २३०१   (मागील वर्षीच्या यादीतील)   
१८) इमारत क्रमांक १, खेतवाडी १२ वी  गल्ली(डी ) २०४९  (मागील वर्षीच्या यादीतील)  
१९)  इमारत क्रमांक ३१-सी व ३३- ए रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी  
२०)   इमारत क्रमांक १०४-१०६ मेघजी बिल्डिंग अ, ब  व क विंग , शिवदास चापसी मार्ग  
२१) इमारत क्रमांक १५-१९ के . के. मार्ग व१-३ पायस स्ट्रीट

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना नसतानाही दिला रेमडेसिविरचा अतिरिक्त डोस; रुग्णावर ओढावला मृत्यू

रत्नागिरीतील 31 गावांना सावधानतेचा इशारा