in

अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरुन धुळ्यातील दोंडाईचा इथं दंगल झाली. बुधवारी रात्री झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपींच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. यात पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी गोळीबार केला होता. यात २ जखमी झाले आहेत.

दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन मुलांनी दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. पीडितेनं हा प्रकार भावाला सांगितला. छेड काढणाऱ्या दोन मुलांना त्यानं चोप दिला. यानंतर आरोपींना अटक झाली.

दरम्यान, आरोपीच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यात गोळीबारात दोन जण जखमी झाले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह २ पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करत असताना पुन्हा वाद निर्माण होऊन दोन गटात हाणामारी झाली. यात दोंडाईचा येथील एक तरुण गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sachin Vaze | वाझे प्रकरणात आता वाझेंच्या एक्स गर्लफ्रेंडची एन्ट्री ?

मुंबई-गोवा हायवेचे काम अपूर्ण; हायकोर्टाने घेतली गंभीर दखल