in

Oxygen express; ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल

विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल झाली आहे. या एक्स्प्रेसमधील सात पैकी तीन ऑक्सिजन टँकर नागपूरमध्ये उतरविले जाणार आहेत.यामुळे नागपूर आणि विदर्भातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान नागपुरात हि टँकर उतरवल्यानंतर ही एक्स्प्रेस नाशिकसाठी रवाना होणार आहे.

राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी दाखल झाली. त्यानंतर या एक्सप्रेसवरील 7 रिकाम्या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आला. प्रत्येक टँकरमध्ये 15 ते 20 टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्राला जवळपास 100 टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Hanumaan Jayanti: हनुमान जयंतीनिमित्त गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Maharashtra Corona | लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी राज्यात 66, 836 रुग्ण