in

ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशकात दाखल

राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी केंद्राकडून टँकरद्वारे महाराष्ट्राला ऑक्सिजन पाठविण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी नाशिकच्या नांदगांव रेल्वे स्थानाकावरून चार टँकर घेऊन नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या दिशेने ही एक्स्प्रेस पुढे रवाना झाली.

मनमाड रेल्वे स्थानकातही एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे. साधारण १०८ मेट्रीक टनाचा ऑक्सीजन घेवून सकाळी १० वाजेच्या सुमारास हे टँकर नाशिकला पोहोचणार आहे..नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे या एक्स्प्रेसचे नाशिक रेल्वे स्थानकावर स्वागत करणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्वर्ग तर दूरच, नरक तो हाच का?; ‘सामना’मधून टीकास्त्र

कोरोना विषाणू प्रसार रोखण्यास लस प्रभावी; तज्ज्ञांचा दावा