in

Oxygen Express | दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल

गेले काही महिने अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावणारी रेल्वे आता ऑक्सिजन पुरवण्यासाठी धावत आहे. ऑक्सिजन पुरवठा करून रेल्वे सध्या ही ओळख शब्दश: खरी ठरवत आहे. गेल्याच आठवड्यातून विशाखापट्टणमहून ऑक्सिजन एक्स्प्रेस राज्यात दाखल झाली. नागपूर, नाशिक भागात ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून ऑक्सिजनचे टँकर उतरवण्यात आले. या एक्स्प्रेसमधून राज्याला १०० टनांहून अधिक अधिक ऑक्सिजनचा पुरवठा झाला.

आज दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल झाली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ऑक्सिजनचे तीन टँकर्स घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत पोहोचली. काल संध्याकाळी गुजरातच्या हापामधून ही एक्स्प्रेस निघाली होती. जामनगरमध्ये असलेल्या रिलायन्स उद्योगातून ऑक्सिजन घेऊन या एक्स्प्रेसनं ८६० किलोमीटर अंतर कापलं. या एक्स्प्रेसमधील टँकर्समधून महाराष्ट्राला ४४ टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today | सोनं खरेदी करण्यापूर्वी आजची किंमत तपासा

परमबीर सिंह यांच्यावर पत्र देण्यासाठी कुणाचा दबाव? : हसन मुश्रीफ