in ,

Oxygen Shortage | ठाण्यात रुग्णांच्या मृत्यू; ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठाण्यातील वर्तक नगर नाक्यावरील वेदांत या खाजगी कोरोना रुग्णालयातील 4 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असल्याने हॉस्पिटलच्या बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालय प्रशासनाने मात्र तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची कबुली दिली असून हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे रुग्णालयाच्या वगीने स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 53 रुग्ण दाखल असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नाही. तसेच रुग्ण दगावण्याचा घटना या पहाटे चार ते सकाळी 9 या कालावधीत मृत्यू झाले आहेत अशी माहिती रूग्णालयाकडून मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात; फडणवीसांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका

मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका