in

उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले ; ऑक्सिजनच्या वाहतुकीवर सर्व निर्बंध हटवले

देशभरातील कोविड रूग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकार ऑक्सिजन वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध लावण्यात आले नाहीं आहे. कोणत्याही एका राज्यासाठी पुरवठा मर्यादित ठेवला जाऊ शकत नाही. केंद्र सरकार ऑक्सिजनच्या वाहतुकीवर सर्व निर्बंध हटवले आहेत . केंद्र सरकारने याचबरोबर ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर पूर्णबंदी बंदी केली आहे.

उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकार करोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान देखील ऑक्सिजनचा पुरवठा अडवत आहेत आणि दिल्लीत ऑक्सिजनचा साठा झपाट्याने संपत आहे, अशी तक्रार दिल्ली सरकारने केल्यानंतर, केंद्र सरकारकडून निर्देश देण्यात आले की, ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणत्याही अडवणूकविना वाहतुकीस परवानगी असेल.

दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. यावेळी सांगण्यात आले की,आता एक आदेश जारी करण्यात आला आहे की, कुठेही ऑक्सिजन वाहतुकीस रोखता येणार नाही. केंद्राचा आहे आदेश सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाबाधितांसाठी ‘विठुराया’ आला धावून; 200 बेडचे कोविड सेंटर उभारणार

Chaitra Yatra: पंढरपुरातील चैत्र यात्रा रद्द