in

आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी निधी देणार- अजित पवार

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन व्हेंटीलेटर बेड वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी निधी देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रक्कमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निधीची कमतरता पडता कामा नये. जवळपास मुख्यमंत्र्यानी साडे पाच हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यापैकी 3300 कोटी रुपये कोरोनाच्या कामासाठी खर्च करण्यासाठी परवागनी देण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.कोरोनाविरोधात लढण्याासाठी राज्यातील सर्व मतदारसंघात एकूण 350 कोटी रुपये खर्च करण्यासाठी तत्काळ मान्यता देण्यात आली आहे.

डॉक्टरांनी सहकार्य करावे

ससून रुग्णालयात मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट बेड वाढवलेले आहेत. माझी डॉक्टरांना विनंती आहे . आपण ससून रुग्णालय हे कायमस्वरुपी कोव्हिड रुग्णालय बनवणार नाहीत. डॉक्टरांच्या काही मागण्या आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या काही मागण्या असतील तर सरकार म्हणून आम्ही त्यामध्ये लक्ष घालू. मात्र, डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं तर सरकारला सुद्धा कठोर निर्णय घ्यावा लागेल. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अशी मी विनंती घेतो. डॉक्टरांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अशी मी विनंती करतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PNB Scam | नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

Citi Bank | चार हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; सिटी बँक भारतातून गाशा गुंडाळणार