in

Palghar Monsoon | पालघरमध्ये पावसाच्या सरी… जनजीवन विस्कळीत

वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाने सुरुवात केली आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सकल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. मात्र विरार फाट्यावरील खैरपाडा (वरठापाडा) या परिसरातील वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भूमाफियांनी नैसर्गिक नाले बुजवून, अनाधिकृत चाळीचे बांधकाम केल्याने सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे खैरपाड्यात नदी नाल्याचे स्वरुप आले आहे. हवामान खात्याने राज्यभरात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात सरी कोसळायला सुरुवात झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रुममध्ये कॅमेरा लावणाऱ्या डॉक्टरला अटक

Rashmika Mandanna | पाहा रश्मिकाचा ‘गुडबाय’मधला लूक