in

Pandharpur election |अभिजित बिचुकले लढविणार पंढपुरातून पोटनिवडणूक

मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. थोड्याच वेळात ते अर्जदेखील दाखल करणार आहेत.

विठुरायाच्या नगरीची नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही आणि राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी पंढरपूर पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करत असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही असा सवाल करत आपण या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही बिचुकले यांनी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक | कोरोनाग्रस्त वृद्धाने ऑक्सिजनच्या पाइपने घेतला गळफास

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला