in

Pandharpur Election Results | समाधान आवताडेंच्या घराबाहेर समर्थकांचा विजयी जल्लोष

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे. अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार ७१६ मतांनी पराभव केला. 

मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत. सातव्या फेरीपासून मात्र अवताडेंनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 36 फेऱ्या पार पडल्या. तर, सुरुवातीला पोस्टल मतमोजणी घेण्यात आली. त्यामध्ये भगिरथ भालकेंना आघाडी मिळाली होती. तेथून पहिल्या 5 फेऱ्या होईपर्यंत भालकेंनी आघाडी कायम ठेवली. मात्र, त्यानंतर, आवताडेंनी आघाडी घेत शेवटपर्यंत मतांचा आलेख वाढतच नेला. अखेरच्या टप्प्यात ते भूमिपुत्र असलेल्या मंगळवेढा मतदारसंघातूनही त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं. त्यामुळे, त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Election Result Live| पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात काय, रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा