in

केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार नाही; पंकजा मुंडेंनी सरकारला सुनावलं

राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटासाठी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला मोलाचा सल्ला देत खडेबोल सुनावले आहेत.

राज्य सरकारला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी जास्तीत जास्त लसीकरण केंद्र कमीत कमी अवधी हे सूत्र पाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लसींचं उत्पादन करणे, साठा बनवणे, तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

1 मे रोजी सेकंड डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे. तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे तो पाळलाच पाहिजे. 18 वर्षांवरील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी सरकारचा सामाचारही घेतला आहे. तसेच राज्याचे व्हॅक्सीन, रेमडेसिवीरचे ऑडिट आणि दैनंदिन वार्तापत्रं झाले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापूर, नाशिक, जालन्यात मुसळधार पाऊस

TIME मॅगझिनच्या १०० प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत Jio Platforms चा समावेश