in

परमबीर सिंहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; सट्टेबाज सोनू जालानचा जबाबात मोठा गौप्यस्फोट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी आता आणखी वाढवण्याची शक्यता आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान याने CID ला दिलेल्या जबाबात खळबळजनक आरोप केला आहे. “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्याला ‘मोठ्या केस’मध्ये अटक नको असेल, तर माजी पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे १० कोटी रुपये जमा करायला सांगितले होते.” असा मोठा आरोप सोनू जालानने केला आहे. त्याच्या जबाबाविषयी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सोनू जालानची सीआयडीने चौकशी केली. यावेळी त्याने परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल, तर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे १० कोटी रुपये जमा कर” असं परमबीर सिंह यांनी आपल्याला सांगितल्याचा आरोप सोनू जालानने केला आहे. सोनू जालानच्या आरोपावर परमबीर सिंह किंवा प्रदीप शर्मा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सीआयडी परमबीर सिंह, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

नाशिक | रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल