in

मुंबईच्या टोल नाक्यावर मासिक पासधारकांना फास्टॅगमध्ये पासची सुविधा

मुंबईच्या वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या टोलनाक्यावर आता उद्या 27 एप्रिल 2021 पासून मासिक पासधारकांना फास्टॅगमध्ये पासची सुविधा मिळणार आहे. या संदर्भातली माहिती सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली आहे.

वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या पथकर नाक्यावरुन मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता फास्टॅग मध्येच मासिक पास देणेच्या योजनेबाबत सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले की, पथकर नाक्यावर प्रत्यक्ष जाऊन रोख रक्कम देऊन मासिक पास खरेदी करण्याच्या पूर्वीच्या पध्दतीत बदल करण्यात आला आहे. आता बँकेस ऑनलाईन पध्दतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगच्या द्वारे मासिक पास घेता येईल व फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिकामधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोल नाका पास करता येणार आहे. विशेष म्हणजे मासिक पास फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच मिळेल ज्या वाहनधारंकाकडे फास्टॅग नसेल त्यांनी प्रथम फास्टॅग घेणे आवश्यक आहे.

दोन पर्याय

वाहनधारकासाठी ऑनलाईन पध्दतीमध्ये 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे संकेतस्थळ www.nhai.org व दुसरा पर्याय icicibankfastaglogin द्वारे मासिक पासची रक्कम बँकेस हस्तांतरण करता येते व मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांक संबधित पथकर नाक्यावर 3 दिवसाचे आत जाऊन त्यानुसार मासिक पास कार्यान्वित करुन घ्यावा लागेल. मुदतीत कार्यान्वित न केल्यास पास आपोआप रद्द होवून तेवढी रक्कम वाहन धारकाचे खात्यात परत जमा होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Vaccination Scam| दहा दिवसात सहा रॅकेटचा पर्दाफाश

…आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीय; केंद्र सरकारचा इशारा