in ,

कोरोना संकटात पठाण बंधूनी केली ऑक्सिजन संचाची मदत

देश कोरोना संकटात असताना इरफान व युसूफ हे पठाण बंधू यांनी परत एकदा मदतीसाठी हात पुढे केला आहे. पठाण बंधू गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण दिल्ली आणि वडोदरा येथील कोरोनाबाधित कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याचं काम ते करत आहेत. मागच्या वर्षी या बंधूंनी जवळपास ९० हजार कुटुंबीयांच्या घरी रेशन पूरवण्याचं काम केलं आहे. आता ते वडोदरा येथे ज्यांना ऑक्सिजन संच हवा आहे त्यांनाही तो मोफत देत आहेत. क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स च्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देत आहेत. इरफान पठाण सोशल मिडीयावर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

किरण खेर यांचा कॅन्सरशी लढा; 3 तास चालली बोन सर्जरी

Yass Cyclone | पंतप्रधानांच्या बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार