in ,

व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर आणणाऱ्या घटना समोर येत आहेत. नाशिक महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडरसह बुधवारी आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी कोरोनाबाधितानं आंदोलन केलं होते. बुधवारी संध्याकाळी महापालिका मुख्यालयात रुग्णानं ऑक्सिजन सिलेंडरसह ठिय्या मांडला होता. संबंधित कोरोना रुग्णाच्या आंदोलनानं महापालिका परिसरात खळबळ माजली होती. आंदोलनानंतर पालिका प्रशासनानं त्या रुग्णाला बिटको रुग्णालयात रुग्णालायात दाखल केलं होतं. महापालिका प्रशासनानं ऑक्सिजन बेडसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केलं होतं. मध्यरात्री बिटको रुग्णालयात संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजपासून गॅस सिलेंडर ते हवाई प्रवासामध्ये मोठे झाले बदल

महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २७८० कोटींची घोषणा; नितीन गडकरी यांची माहिती