पेट्रोल – डिझेल च्या किमतीत दररोज चढउतार होत असतात. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलचे दर हे जैसे थे पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांना आर्थिक त्रास होताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.10 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 98.66 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 88.66 रुपये इतका आहे.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता
Comments
Loading…